श्रद्धेय विलासरावजी देशमुखसाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान लोकनेते, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री श्रद्धेय विलासरावजी देशमुखसाहेब यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
समूह प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिक (गळीतधान्य) खरीप २०२६–२७ अंतर्गत प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रक्षेत्र भेटीमध्ये प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन गळीतधान्य पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
समूह प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिक (कडधान्य) खरीप २०२६–२७ अंतर्गत मौजे बोरगाव (न.), ता. औसा, जि. लातूर येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. सदर प्रक्षेत्र भेटीदरम्यान प्रात्यक्षिकांतर्गत घेण्यात आलेल्या मूग पिकाची पाहणी व प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले.
मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, लातूर येथे एल. एस. गोहिल मेमोरियल फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून आयोजित ऊस तोडणी यंत्र चालक प्रशिक्षण कार्यक्रमाची पहिली तुकडी दि. 11 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत यशस्वीरित्या संपन्न झाली
समूह प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिक (कडधान्य) खरीप २०२६–२७ अंतर्गत मौजे मोगा, ता. अहमदपूर येथे मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर व परिवर्तन संस्था, सुमठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी महिला व पुरुषांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक २.९.२०२६ रोजी राष्ट्रीय पोषण माह निमित्त अंजली ए. गुंजाळ, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, लातूर यांनी शेतकरी महिलांमध्ये कुटुंबाच्या पोषण व आरोग्यासाठी नैसर्गिकरित्या पिकविलेल्या, स्थानिक पातळीवर उपलब्ध आणि पोषक घटकांनी समृद्ध अन्नपदार्थांचे महत्त्व याबाबत जनजागृती केली
मांजरा कृषि विज्ञान केंद्र, लातूर यांच्या वतीने प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक (FLD) अंतर्गत हरंगुळ, ता. लातूर येथे दिनांक ८.९.२०२६ सोयाबीन पिकावर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी डॉ. सचिन शिंदे, विषय विशेषज्ञ (कृषि अभियांत्रिकी) यांनी ड्रोनच्या सहाय्याने फवारणीची प्रत्यक्ष पद्धत शेतकऱ्यांना समजावून सांगितली.
मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, लातूर यांच्या वतीने दिनांक ०७ ते ०९ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेला ‘शास्त्रोक्त दुग्धव्यवसाय’ हा तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्ह्यातील ७० शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर, कृषी विभाग, लातूर आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF) सन २०२६–२७ अंतर्गत तळेगाव, ता. देवणी येथे संस्थास्तरीय नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत देवणी तालुक्यातील तीन गावांमधील एकूण ३४२ महिला शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर, कृषी विभाग–आत्मा व माविम यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला किसान दिवस साजरा करण्यात आला.
एल. एस. गोहिल मेमोरियल फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून ऊस तोडणी यंत्र चालक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत व मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, लातूर येथे एल. एस. गोहिल मेमोरियल फाउंडेशनच्या सीएसआर (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) निधीतून आयोजित करण्यात आलेल्या ऊस तोडणी यंत्र चालक प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
मौजे खरोसा, ता. औसा, जि. लातूर येथील प्रगतिशील शेतकरी श्री. रामेश्वर डोके यांच्या ड्रॅगन फ्रूट प्रक्षेत्रास कृषि विज्ञान केंद्र, लातूरच्या वतीने प्रक्षेत्र भेट देण्यात आली.
जनावरांच्या आहारात प्रो-बायोटिक म्हणून ईएम (Effective Microorganisms) द्रावणाचा वापर या विषयावर मौजे माटेफळ, ता. लातूर येथे प्रक्षेत्र चाचणी घेण्यात आली.
समूह प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिक (कडधान्य) खरीप २०२६–२७ अंतर्गत मौजे झरी (बु.), ता. चाकूर, जि. लातूर येथे मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर व परिवर्तन संस्था, सुमठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी महिला व पुरुष यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission on Natural Farming – NMNF) अंतर्गत कृषी सखींना नैसर्गिक शेती पद्धती विषयी ज्ञान व कौशल्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने पाच दिवसीय कृषी सखी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर व आत्मा कृषी विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission on Natural Farming – NMNF) अंतर्गत कृषी सखींसाठी आयोजित पाच दिवसीय नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत नुकताच संपन्न झाला.
मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, लातूर येथे L. S. Gohil Memorial Foundation यांच्या CSR निधीतून आयोजित करण्यात आलेल्या ऊस तोडणी यंत्र चालक प्रशिक्षण कार्यक्रमाची बॅच क्र. 04 दिनांक 31 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर 2026 या कालावधीत यशस्वीरित्या संपन्न झाली. या पाच दिवसीय प्रशिक्षणामध्ये एकूण 15 प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला
मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, लातूर यांच्या वतीने खरीप हंगाम २०२६ अंतर्गत तेलबिया पिकांच्या समूह अग्रभागीय प्रात्यक्षिक (Cluster Frontline Demonstration – CFLD) कार्यक्रमांतर्गत लातूर तालुक्यातील अंकोली येथे दिनांक १२.१०.२०२६ रोजी सोयाबीन वाण KDS-992 वर प्रक्षेत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, लातूर व आत्मा कृषि विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने “दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यावर फळबाग व रब्बी पिकांचे व्यवस्थापन” या विषयावर दिनांक ८.१०.२०२६ रोजी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.