सूचना – कृषी शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया
कृषी शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया लिंक:
https://ycmouadmagri.dulive.ac/applicant/#/login?client=YCMOUAGRI
नमस्कार,
सर्व कृषी शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेशासाठी खालील सूचनांचे पालन करावे.
विद्यार्थ्यांसाठी
1. सर्वप्रथम *New Registration* करून नोंदणी पूर्ण करावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेल्या *User ID* व *Password* चा वापर करून लॉगिन करावे.
2. प्रवेश अर्जातील आवश्यक माहिती भरावी. *()** चिन्हांकित सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे.
3. ज्या विद्यार्थ्यांकडे *16 अंकी PRN* आहे, त्यांनी *Other Details* या पानावर तो अनिवार्यपणे नमूद करावा.
4. फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट व योग्य स्वरूपात अपलोड करावीत.
5. योग्य *College/Study Centre* व *Programme* निवडावा.
6. अर्जातील सर्व माहिती *Confirm* पानावर पडताळून पाहिल्यानंतरच अर्ज *Submit* करावा.
7. अर्ज *Submit* झाल्यानंतर तो मंजुरीसाठी संबंधित अभ्यासकेंद्राच्या *Study Centre Login* मध्ये उपलब्ध होईल. अभ्यासकेंद्राकडून अर्ज *Approved* झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये *Payment* ची लिंक उपलब्ध होईल. त्याद्वारे प्रवेश शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करावी.
8. प्रवेश शुल्क भरल्यानंतरच प्रवेश *Confirmed* होईल.
9. शुल्क भरल्यानंतर अर्जाच्या *दोन प्रती* काढाव्यात. त्यापैकी एक प्रत स्वतःकडे ठेवावी व दुसरी प्रत अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह संबंधित अभ्यासकेंद्रात जमा करावी.
अभ्यासकेंद्रांसाठी
1. विद्यार्थ्यांनी *Submit* केलेले प्रवेश अर्ज *Study Centre Login* मध्ये उपलब्ध होतील. लॉगिन करून विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची तपासणी करावी.
*सूचना:* Study Centre Login ची माहिती व Presentation लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
2. विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक पडताळणी करून अर्ज *Approved* किंवा *Rejected* करावा.
3. अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना *SMS* द्वारे प्राप्त होईल. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासावी.
4. विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश अंतिम (*Confirmed*) मानला जाईल.
*टीप:* विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्यानंतरच प्रवेश अर्ज मंजूर करावा.
